पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते जिल्ह्यातील युवांचा सन्मान

| Updated on: Aug 07, 2021 | 9:03 PM

महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2012 नुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या युव‍क, युवतींच्या कामगिरीचा गौरव व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते जिल्ह्यातील युवांचा सन्मान
Follow us on

नाशिक : महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2012 नुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानला आहे. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या युव‍क, युवतींच्या कामगिरीचा गौरव व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (Chhagan Bhujbal honors youth of Nashik)

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक व पुरस्कार प्राप्त युवक व युवती उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते 2018-19 साठी हेमंत काळे, अश्विनी जगदाळे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. तसेच उधाण युवा बहुउद्देशीय मंडळ या संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. 2019-20 साठी चिन्मय देशपांडे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. शिव युवा प्रतिष्ठाण देवळाली कॅम्प संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले

2020-2021 साठी मोनाली चव्हाण यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 10 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्था कळवण यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये देवून गौरविण्यात आले.

इतर बातम्या

नाशिकमध्ये डेल्टा व्हॅरिएंटचे 30 रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर, तातडीची बैठक सुरू

कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय : छगन भुजबळ

Maratha Reservation : ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

(Chhagan Bhujbal honors youth of Nashik)