मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय?, भुजबळ म्हणाले, अहं हं हं… ना ना ना…; मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत!

| Updated on: Oct 16, 2021 | 12:55 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यावरून टीका टिप्पणी होत आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय? असा सवाल करण्यात आला. (chhagan bhujbal reaction on his will on cm post)

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय?, भुजबळ म्हणाले, अहं हं हं... ना ना ना...; मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत!
chhagan bhujbal
Follow us on

नाशिक: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यावरून टीका टिप्पणी होत आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर अहं… हं हं… ना ना ना… अजितबात नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत. उलट म्हणतात बरं झालं हा गेला. त्यामुळे मी आहे तिथे संतुष्ट आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेली त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत विचारण्यात आलं. त्यावर भुजबळांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देऊन पत्रकारांची फिरकी घेतली. अहं हं हं… ना ना ना… अजितबात नाही. मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो किती मुख्यमंत्र्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत? अनेक मुख्यमंत्री पाय उतार झाल्यानंतर त्यांना दोन माणसंही भेटत नाहीत. किंबहुना गेला तो बरा झाला असं म्हणतात. आज मला जनतेकडून जे प्रेम मिळतंय ते महत्वाचं आहे. ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मी देशभर फिरतोय. लोक प्रेम करतात हे चांगलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेत राहणार आहे. त्यांचं प्रेम मिळतंय हे महत्त्वाचं. मुख्यमंत्री किती तरी येतात आणि जातात. शरद पवार साहेब, विलासराव देशमुख किंवा उद्धव ठाकरे हेच लोकं लक्षात राहतात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकराव चव्हाण साहेब ही मोठी मंडळी होती. त्यांचं राज्यासाठी मोठं योगदान आहे. पण मी आहे त्यात संतुष्ट आहे. मला सर्वांनी फ्रि हँड दिला आहे. मी निर्णय घेतो ते माझ्या पाठी उभे राहतात, असं भुजबळ म्हणाले.

बाळासाहेब म्हणायचे, तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते

खंत नाही. मला बरोबर माहीत आहे मी काय बोललो ते. बाळासाहेबच म्हणायचे भुजबळ गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. मी त्यावेळी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. त्यावेळी मी शिवसेना-भाजप सरकारवर तुटून पडलो होतो. तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. काही केसेसही टाकल्या होत्या. त्यात काही खरं नव्हतं. त्यावेळी मी निधड्या छातीने लढत होतो. त्यावेळी काँग्रेसचं विभाजन झालं नव्हतं. तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं तुमचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असणार तेव्हा पवार म्हणाले, आणखी कोण असणार भुजबळच असणार, असं भुजबळांनी सांगितलं.

शरद पवार म्हणाले, भुजबळांशिवाय आहेच कोण?

मात्र नंतर पवार साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले. मीही पवारांसोबत गेलो. तेव्हा शीला दीक्षित, माधवराव शिंदे, राजेश पायलट, सुरेश कलमाडी, मुकुल वासनिक, जॉर्ज आदींचे मला फोन केले. तुम्ही या. तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. पण मी त्यांना नाही म्हटलं. मी शिवसेना सोडली. ओबीसीच्या राजकारणामुळे. पवारांचा हात धरला. पवारांनी आमच्या भावना पूर्ण केल्या. मी आहे त्यात खूश आहे. मी काही येणार नाही, असं मी त्यांना सांगितलं, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

काही नसताना राष्ट्रवादीला मोठा विजय मिळाला

त्यावेळी विलासराव देशमुखांचा विधानसभेत पराभव झाला होता. त्यामुळे ते या लढाईत नव्हते. या लढाईत काँग्रेसच्या वतीने मीच होतो पुढे. विधानपरिषदेत. मी सरकारवर हल्ले करायचो. सरकार माझ्यावर हल्ले करायचे, असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रवादीचा तेव्हा जिल्ह्यात जिल्हाध्यक्षही नव्हता. त्यातही आम्हाला संधी मिळाली. काँग्रेसपेक्षा पाच सहा जागा कमी मिळाल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या, महाजन यांची सिनेनिर्मात्याला गळ; निर्मात्यानेही घेतली फिरकी

‘वसुली सरकार एकतर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं’, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

(chhagan bhujbal reaction on his will on cm post )