…म्हणून साहित्य संमेलन आयोजित करणं अशक्य, छगन भुजबळांनी सांगितलं कारण

| Updated on: Jul 25, 2021 | 1:38 PM

नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले होते

...म्हणून साहित्य संमेलन आयोजित करणं अशक्य, छगन भुजबळांनी सांगितलं कारण
छगन भुजबळ
Follow us on

नाशिक: नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले होते.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे  साहितय संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना विषाणू ससंर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे आयोजन करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. 94 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष देखील आहेत.

साहित्य महामंडळाकडून साहित्य संमेलनाबद्दल विचारणा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पालकमंत्री भुजबळ यांना पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का आणि तारीख कळवावी असे पत्र पाठवले होते. छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या दुसरा लाटेतून नाशिक कर आता कुठे सावरत आहे. त्यात पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यामुळे गर्दी होण्याचा धोका जास्त वर्तवला जात आहे, त्यामुळे साहित्य संमेलन शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

गर्दी टाळण्यासाठी ओबीसी आंदोलन थांबवलं

संमेलनामुळे हजार दोन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त व्यक्ती एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आम्हीदेखील ओबीसी आंदोलन थांबवले आहे असे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकवर म्युकरमायकोसिसचं संकट

कोरोनाचा धोका कमी होत असला, तरी नाशिकमध्ये म्युकरमायक्रोसिस चा धोका मात्र कायम असल्याचं जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे 776 रुग्ण आढळून आले होते,त्यापैकी सद्यस्थितील म्युकर मायकोसिसचे जिल्ह्यात 180 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 64 रुगणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान नागरिकांनी लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नाशिक कोरोना अपडेट 24 जुलै 2021

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 139
पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 105

नाशिक मनपा- 62
नाशिक ग्रामीण- 40
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8491

शनिवारी कळवलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00

इतर बातम्या:

नाशिकमध्ये पावसाची उघडीप, पाणी कपात कायम राहणार, महापालिका आयुक्तांची माहिती

नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा होणारं भावली धरण भरण्याच्या मार्गावर, नियोजनाअभावी शहरात पाण्याची चिंता

Chhagan Bhujbal said due to third wave of corona virus Sahitya Samelan of Nashik is postpone