नाशिक : लासलगाव बाजार समितीत शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. लिलावानंतर व्यापाऱ्याने मक्याबद्दल तक्रार केल्यामुळे हा वाद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
लासलगाव बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये मक्याचे पीक विकायला आणले होते. मका विकल्यानंतर व्यापाऱ्याने ते गोडाऊमध्ये खाली करायला नेले. मात्र खाली करताना व्यापाऱ्याने मक्याच्या दर्जाबद्दल तक्रार केली. याच कारणामुळे नंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी घडला. मक्याच्या दर्जासंदर्भात व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर दोघांमध्येही वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे शाब्दिक बाचबाचीत झाले. हा वाद वाढत गेल्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील वाद नंतर वाढत गेला. या वादाचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापारीविरोधात बाजार समितीकडे तक्रार दाखल केली आहे. बाजार समिती आता व्यापाऱ्याविरोधात काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
NashikGold: उठा उठा दिवाळी आली, दागिने खरेदीची वेळ झाली; सोने 700 तर चांदी 2 हजारांनी स्वस्त!
आधार कार्डचा गैरवापर केल्यास पडणार भारी, UIDAI आता 1 कोटींचा दंड करण्याची शक्यता#aadhar #Aadharcard #FakeAadharCard #uidai https://t.co/zDsrsFFnmA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021