नाशिकच्या गोदाघाटावर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, ठाकरेंच्या दौऱ्यावेळी नेमकं काय घडलं?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज गोदातीरी महाआरती करण्यात आली. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरातून पूजा करुन गोदाघाटावर आले त्यावेळी शिवसैनिकांनी गोदाघाटाच्या बाहेर गर्दी केली होती. यावेळी गोदाघाटात प्रवेश करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी आवरणं पोलिसांसाठी कठीण झालं. याच दरम्यान पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली.