Nashik | अधिकाऱ्यांच्या संगनमताने नाशिक शहरात मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप, महापालिकेने बिल्डरला पाठवली नोटीस

| Updated on: Aug 24, 2022 | 9:20 AM

माजी नगरसेवक अनिल चौघुले यांच्या आरोपांनंतर नाशिक शहरात मोठी चर्चा सुरू झालीयं. मोठ्या भूखंड घोटाळा महापालिकेत झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत होती. मात्र, खरोखर हा भूखंड घोटाळा झाला आहे का? आता यावर महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांनाचे लक्ष लागले आहे.

Nashik | अधिकाऱ्यांच्या संगनमताने नाशिक शहरात मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप, महापालिकेने बिल्डरला पाठवली नोटीस
Follow us on

नाशिक : नाशिक (Nashik) महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहरात मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोयं. महापालिकेच्या आरक्षित जागेवर बिल्डरने अधिकाऱ्यांच्या संगनमताने एक व्यावसायिक इमारत उभारल्याचा आरोप (Accusation) केला आहे. या आरोपानंतर नाशिक शहरात मोठी खळबळ निर्माण झालीयं. हे सर्व आरोप माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी केले आहेत. तसेच यासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे देखील चौघुले यांनी सांगितल्याने बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गंगापूर रोड (Gangapur Road) वरी मोक्याच्या जागी ही इमारत बांधली असल्याची सांगितले जात आहे.
Nashik | नाशिकमध्ये भूखंड घोटाळा झाल्याचा माजी नगरसेवकाचा आरोप-tv9

महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांनाचे लक्ष

माजी नगरसेवक अनिल चौघुले यांच्या आरोपांनंतर नाशिक शहरात मोठी चर्चा सुरू झालीयं. मोठ्या भूखंड घोटाळा महापालिकेत झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत होती. मात्र, खरोखर हा भूखंड घोटाळा झाला आहे का? आता यावर महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांनाचे लक्ष लागले आहे. गंगापूर रोडवरील ही एक अत्यंत मोक्याची जागा आहे. ही महापालिकेची असल्याची सांगितले जात असून त्याच जागेवर एका बिल्डरने व्यावसायिक इमारत उभारली आहे.

हे सुद्धा वाचा

गंगापूर रोडवरील महापालिकेची मोक्याची जागा बिल्डरच्या घशात ?

गंगापूर रोड वरील मनपाची मोक्याची जागा बिल्डरच्या घशात खरोखरच गेली का? अशा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडलायं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेचे 16 कोटींचे नुकसान केल्याचा आरोपही चौघुले यांनी केलायं. विशेष म्हणजे चौघुले यांनी यासर्व प्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे एक तक्रार देखील दिलीयं. तसेच यानंतर महापालिकेने तात्काळ संबंधित बिल्डरला नोटीस देखील दिलीयं. बिल्डरचा बिल्डिंग परवाना रद्द करून अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी चाैघुले यांनी केलीयं.