नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात पावसाची (Rain) संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येणार आहे. आज बुधवारी (22 सप्टेंबर) दुपारी एक वाजता हा विसर्ग 6000 क्युसेक्स केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. (Gangapur dam filled, will release a total of 6000 cusecs of water at 1 p.m.)
नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. नाशिकला पाणीपुरवठा करण्या गंगापूर धरण परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारी एकपासून या धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने 6000 क्युसेक्स करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. गौतमी गौदावरीचा साठा 97 टक्क्यांवर, तर काश्यपीचा जलसाठा 87 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दरम्यान, दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.
धरणांवर जमाबंदी
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही भरत आली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.
गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्याने वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण विसर्ग बुधारी दुपारी 1 वाजता एकूण 6000 क्युसेक्स करण्यात येणार आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक (Gangapur dam filled, will release a total of 6000 cusecs of water at 1 p.m.)
इतर बातम्याः
सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी
चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत