नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत शुक्रवारी (1ऑक्टोबर ) 24 कॅरेट सोने 700, 22 कॅरेट सोने 800 रुपयांनी महागले, तर चांदी किलोमागे दोन हजारांनी महागली. येत्या काळात हे भाव अफाट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नाशिकच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी सोन्याच्या घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरून दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर तब्बल एक हजाराने घसरून दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे तीन हजारांनी घसरून 59500 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी मात्र, सोने आणि चांदीचे दर महागले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44800, तर चांदीचे दर किलोमागे 61500 नोंदवले गेले.
किमती अफाट वाढणार
दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.
दसऱ्याकडे डोळे
सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.
नाशिकच्या सराफा बाजारपेठेत शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44800 नोंदवले. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. चांदीचे दर किलोमागे 61500 नोंदवले गेले.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold and silver prices rose in Nashik bullion market)
इतर बातम्याः
खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन
ऐसी धाकड है! जिगरबाज कोमलला तिसरे सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा दबदबा
भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स