महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत कोणते मुद्दे अधिक प्रभावी ठरले? ‘वंचित’ फॅक्टर किती प्रभावी ठरला यावर राजकीय विश्लेषक हेमंत भोसले यांनी भाष्य केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या विचार करता पंधरा-सोळा जागेवर उमेदवार पडले होते. वंचितच्या संदर्भातील चर्चा भाजपची बी टी अशा होत्या. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे जाणारा जे मतदान होते. ते मतदार आता हुशार झाले. वंचित बहुजन आघाडीला झालेलं मतदान यंदा 25% पर्यंत आलेलं असेल, असं ते म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांचा होता. उत्तर महाराष्ट्रातील कांदा प्रश्नाचा 14 ते 15 मतदारसंघावरती फटका बसेल, असं दिसतं आहे. मराठा आरक्षणाचा ही मुद्दा या निवडणुकीत चर्चेचा दिसला. वात प्रतिवाद अशा स्वरूपाचा हे निवडणूक दिसले. ज्या मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरायला पाहिजे होती, तसं दिसलं नाही, असं हेमंत भोसले यांनी म्हटलं आहे.
सुरुवातीला 45 प्लस असं महायुतीचा चित्र सांगितलं जात होतं. तसं प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. राम मंदिराच्या मुद्द्याने काही मत पक्की झाली. जी काठावर लोक होती. भाजपला मतदान करावी की नाही त्यांचीही मत पक्कं झाली. हे थोडं आधी झाल्यामुळे राम मंदिर चा मुद्दा निवडणुकीपर्यंत पुसला गेला. राम मंदिर निर्माणच्या दिवशीच वातावरण निवडणुकीपर्यंत दिसला नाही. त्यामुळे परिणाम झालेला दिसला. सहानुभूतीची लाट मतात परिवर्तन होणार आहे, असा अंदाज हेमंत भोसले यांनी व्यक्त केला आहे.
मतदारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे शरद पवारांना एकट पाडलं हे महत्त्वाचं होतं. गद्दारी विरुद्ध खुद्दारी असं होतं. महाविकास आघाडीच्या बाजूने बऱ्यापैकी सहानुभूती चित्र होतं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळाली असून त्याचे रूपांतर मतांमध्ये होईल असं दिसतं. छगन भुजबळांच्या बाबतीत पाहता ओबीसी मतांचा फायदा होता. ओबीसी समाजाने ही महायुतीला मतदान केले का नाही याबाबत साशंकता आहे. संघाची सजीव मत आहेत. संघाचे मुद्दे हिंदुत्वाच्या मुद्दे आहेत. अनेक उमेदवार संघांना पटलेले दिसत नाहीत. त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत दिसेल असं वाटतं, असंही हेमंत भोसले यांनी म्हटलंय.
संकट असल्यावरच गिरीश महाजन यांना बोलावले जाते जळगाव आणि रावेर मध्ये त्यांचे प्रभाव आहे. शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी गिरीश महाजन यांनी मत जोडण्याचा प्रयत्न केला. साम-दाम-दंड-भेद नीती अवलंबली.सुरुवातीला 45 प्लस चा नारा दिला तो शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पुसून टाकला.महाविकास आघाडीचे 32 ते 33 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज आहे, असं हेमंत भोसले म्हणाले.