नाशिकः नागरिकांची जागरुकता आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा लससाठा यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कोरोना (corona) लसीकरणाचा (vaccine) वारू चौखुर उधळून डोसचा आकडा हा तब्बल 25 लाखांच्या घरात गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 24 लाख 74 हजार 722 जणांनी लस घेतली आहे. यातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 18 लाख 31 हजार 204 आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 6 लाख 43 हजार 518 आहे. (In Nashik district, 24 lakh 74 thousand 722 people took corona vaccine)
दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे. त्या प्रमाणात लससाठा उपलब्ध झाल्याने लसीकरणाने वेग धरला आहे. दरम्यान, सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत. महालक्ष्मी सणाच्या खरेदीसाठीही बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. येत्या काळात कोरोना वाढला तर संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील सिन्नर तालुका हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. सिन्नर तालुक्यात सध्या 204 रुग्ण उपचार घेत आहेत. बागलाणमध्ये 28, चांदवड 38, देवळा 14, दिंडोरी 10, इगतपुरी 10, कळवण 08, मालेगाव 20, नांदगाव 14, निफाड 66, पेठ 01, सिन्नर 180, सुरगाणा 02, त्र्यंबकेश्वर 05, येवला 48 अशा एकूण 473 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात309, मालेगाव महापालिका क्षेत्रात 21 तर जिल्ह्याबाहेरील17 रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 6 हजार 692 रुग्ण आढळून आले आहेत.
टक्का वाढला हो…
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक ग्रामीणमधे 96.99 टक्के, नाशिक शहरात 98.94 टक्के, मालेगावमध्ये 97.01 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार145, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 976, मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शाळा उघडण्याची प्रतीक्षा
नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडतच आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्या गावांमध्ये एक महिन्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही, त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यात तूर्तास तरी अशी स्थिती असल्याचे दिसत नाही. (In Nashik district, 24 lakh 74 thousand 722 people took corona vaccine)
इतर बातम्याः
नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण
NashikGold: स्वस्त हो स्वस्त, सोने 100 तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त!
नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी