ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रतिबंध अधिक कडक, लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव

| Updated on: Dec 24, 2021 | 11:47 AM

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचास बंदी घालण्यात आली आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रतिबंध अधिक कडक, लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव
Vaccination
Follow us on

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती बिकट बनली होती. मात्र कोरोना प्रतिबंधक लस आल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. परंतु आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभर धुमाकूळ घातला आहे. राज्यात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असून, कोरोना नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली आहे.

लसीकरणावर भर

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात  ‘नो व्हॅकसिन नो एंट्री’ ची जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. जर तुम्ही कोरोना लसीचे दोनही डोस पूर्ण केले नसतील तर तुम्हाला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. मॉल, दुकान, एसटी स्टँड अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी लसीकरण झाल्याशिवाय आता तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

दरम्यान नागरिकांनी मनात कुठलाही गैरसमज न ठेवता, मोठ्या संख्येने लसीकरण करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरण सेंटरची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे काटकोरपणे पालन करण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

Atul Rane : मराठमोळ्या अतुल राणेंची ब्रह्मोस एअरोस्पेसच्या प्रमुखपदी वर्णी, डीआरडीओमधील 34 वर्षांच्या सेवेचा सन्मान

Video – Nagpur Crime | संशयास्पद स्थितीत ट्रक आढळला; ट्रकमध्ये सापडले 17 लाखांचे घबाड