मालेगाव : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था (Security system) अलर्ट झालीयं. संपूर्ण देशात अमृत महोत्सवाची जोरदार तयारी सुरूयं. हर घर तिरंगा मोहिम आजपासून सुरू झाली असून मालेगाव शहरात घरांवर मोठ्या संख्येने तिरंगे लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोणताही चुकीचा प्रकार घडून नये, याकरिता शहरातील प्रशासन अलर्ट (Alert) मोडवर आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचे चित्र मनमाड रेल्वे स्थानकात बघायला मिळते आहे. लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाकडून संयुक्त तपासणी मोहीम मनमाड रेल्वेस्थानकात (Manmad Railway Station) सुरू आहे.
मनमाड रेल्वे स्थानकात दररोज जवळपास 100 गाड्या ये जा करतात. यामुळे देशातील महत्वपूर्ण मनमाड रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीयं. मनमाड लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्तपणे तपासणी मोहिम राबवून रेल्वे स्थानकातील सर्व 5 प्लॉट फॉर्म, पार्सल कार्यालय, तिकीट बुकिंग कार्यालय यासह येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे प्रवाशी गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे.
मिटेल डिटेक्टर, बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. जंक्शन असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकातून दररोज शंभरपेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची येसजा होत असल्यामुळे येथील सर्व प्लॉट फार्मवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर देखील प्रशासनाचे बारिक लक्ष आहे.