नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत बुधवारी (29 सप्टेंबर) सोने पुन्हा महाग झाले. 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले.
तरुण वर्गामध्ये एकदम झपाट्याने गुंतवणुकीसाठी लोकप्रिय झालेल्या सोन्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळते आहे. रोज शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढतात किंवा उतरतात असेच चक्र या महिन्यात तरी सुरू आहे. नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दराच मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. यात मंगळवारच्या तुलनेत चोवीस कॅरेट सोन्याचे दर 250 रुपयांनी महागले. बावीस कॅरेट सोन्याचे दर पाचशे रुपयांनी महागले, तर चांदीचे दर जैसे थे होते. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.
दसऱ्याकडे डोळे
सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.
नाशिकच्या सराफा बाजारपेठेत बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र
इतर बातम्याः
अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणाला नाट्यमय कलाटणी, निकाळजे म्हणतात, कांदेंवर दावा ठोकणार
नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल