नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला दादर येथील शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यानंतर मनसेच्यावतीनं मुंबई, कल्याण डोंबिवली आणि नाशिक येथे हनुमान चालिसा लावण्यात आली होती. मुंबईत पोलिसांनी हनुमान चालिसा लाऊड स्पीकरवर विना परवानगी लावत लावल्याबद्दल मनसेचे महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेऊन सोडलं होतं. नाशिकच्या भद्रकाली परिसरात मनसेने भोंगे लावले होते. हनुमान चालिसा लावत राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मनसेच्यावतीनं करण्यात आलं होतं. शहरात इतरत्र देखील भोंगे लावण्याचे नियोजन मनसेच्यावतीनं करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी राज्य सरकारच्या नियमांचं पालन करावे लागेल, असं म्हटलंय. आम्ही लाऊड स्पीकर आणि डीजे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणीही कायदा व सुव्यवस्था हाता घेऊ शकत नाही, असं दीपक पांडेय (Deepak Pandey) म्हणाले आहेत.
Maharashtra | We had issued an order to shut all loudspeakers and DJs. No one can take law into their own hands. If anyone tries to disturb the peace, strict actions will be taken against them. We’ll follow the instructions of Maha govt: Deepak Pandey, Nashik Police Commissioner pic.twitter.com/PN3fQ4Pw5o
— ANI (@ANI) April 4, 2022
आम्ही डीजे आणि लाऊड स्पीकर बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणीही कायदा हाततात घेऊ नये. एखाद्यानं शातंता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक करावाई करण्यात येईल, असं दीपक पांडेय म्हणाले आहेत. आम्ही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करत असल्याचं देखील दीपक पांडेय यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.
राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोघांच्या प्रभागात मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्यामुळे अडचण निर्माण झाल्याच कळतंय. मात्र, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. आज होणाऱ्या शहर मनसेच्या बैठकीत याचे पडसाद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर पुणे शहर मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू झालंय. माजिद शेखनंतर आता शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. शेहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे राजीनामा देत असल्याची माहिती समोर आलीय. मनसेतील आणखी काही मुस्लिम पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मशिदीवरील भोंगे व मदरशाबाबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय.
आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या ,आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, अशा प्रकारची मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे.
पुण्यात आज बैठकीत नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मनसेचे पुण्यातील दोन्ही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा समोर येत आहे. हनुमान चालिसा भोंग्यावरून पुण्यात मनसेत नाराजीनाट्य पाहायला मिळतंय.
PMPML : तोट्यातले मार्ग करणार बंद; ST संपानंतर काही ग्रामीण भागांत सुरू केली होती सेवा