औरंगाबादः शहरात क्रिकेटवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा (Betting) लावणाऱ्या तीन बुकींना सायबर पोलिसांनी अटक केली होती. क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या टोळीचे नाशिक कनेक्शन उघड झाले असून सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. मुख्य बुकी सद्दाम शेखसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. दरम्यान, तिघा आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाकरी एस डी कुऱ्हेकर यांनी दिले.
औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी- 20 क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या अड्ड्यावर 21 नोव्हेंबर रोजी छापा मारून पोलिसांनी तबरेज खान, वसीम खान आणि आसेफ शेख या तिघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पाच मोबाइल, दोन दुचाकी आणि पाच हजारांची रोख रक्कम असा सुमारे एक लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडीत नाशिक येथील सद्दाम शेख हा मुख्य बुकी असून त्याचा मोबाइल हा मध्य प्रदेशातील दयाल सिंग याच्या नावे रजिस्टर आहे. तर फोन पे खाते अमित बुऱ्हाचे याच्या नावे असल्याची माहिती आरोपी तबरेज खान याने दिली. तर सद्दाम वापरत असलेला आणखी एका मोबाइल फोन पे अमोल कापडणीस याच्या नावे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सद्दाम शेख याच्याविरुद्ध संभाजीनगरात एकूण दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून सायबर पोलीसांच्या पथकाने नाशिक येथून सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुऱ्हाडे आणि अमोल कापडणीस या तिघांना अटक केली.
या सट्टेबाजांनी औरंगाबाद आणि नाशिक येथील किती लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावला, गुन्ह्यात वापरलेली वेबसाइट कोठे व कोणी तयार केली, आरोपींनी इतर काही साइटचा वापर केला का, आरोपींचे आणखी किती साथीदार आहेत, गुन्ह्यासाठी वापरलेल्या खात्याचा इतर कोणत्या कारणासाठी वापर होत होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.
इतर बातम्या-