नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) विकासाच्या नावाखाली तब्बल पंधरा लाखांचा निधी (Funding) हडपल्याप्रकरणी पाणीपुरवठा शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यासह ताहाराबादच्या महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर जायखेडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीला चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगातून निधी मिळाला होता. मात्र, यातून कामे न करता खोटी बिले सादर करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी सटाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यात खोटी बिले खरी भासवण्याचा प्रयत्न करून सुमारे 14 लाख 63 हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची मुळापासून चौकशी करावी. यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
देवळा तालुक्यातल्या गिरणारे येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवून लाभ घेतलेल्या धनदांडग्यांना घरकुल मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा गिरणारेतल्या नागरिकांनी दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातला हा प्रकार आहे. घरकुल योजनेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार देवरे यांनी सर्वेक्षण केले. त्यासाठी 138 लाभार्थ्यांची निवड केली. मात्र, यात साऱ्या धनदांडग्या लोकांची नावे निवडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, घरकुल योजनेच्या यादीला गिरणारे येथील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. गरजू लाभर्थ्यांना वगळून ज्यांनी पूर्वी घरकुल मिळवले अशांची त्यात नावे आहेत. विशेष म्हणजे यातील लाभार्थी आर्थिक दुर्बल घटाकातील नाहीत. त्यामुळे ही यादी रद्द करावी. पुन्हा एकदा लाभार्थ्यांची निवड करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करू, असा इशारा दिला आहे.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!