रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड, नाशिक : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी ठरला आहे. कारण छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणिआमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं. मात्र दोघांची बाचाबाची इतक्या वेळ चालली की जसं कुणी नळावर भांडणं करतं.
पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसान पाहणी दौऱ्यावर होते. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला शिवसेना आमदार सुहास कांदे हे सुद्धा उपस्थित होते. या दोघांमध्ये नुकसानीच्या तातडीच्या मदतीवरुन शाब्दिक चकमक सुरु झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघेही मोठ मोठ्या आवाजात भांडू लागले.
सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.
संबंधित बातम्या