Photo Gallery: इगतपुरीमध्ये 2 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याच्या काळजाचे पाणी-पाणी!
इगतपुरी तालुक्यातल्या धामणगाव येथे परशुराम गाढवे यांच्या शेतात लागलेल्या आगीमुळे तब्बल 2 एकर ऊस जळून खाक झाला. शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.
1 / 5
आगीमध्ये तोडीस आलेला दोन एकर ऊस जळून खाक झाला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांना यश आले नाही.
2 / 5
तालुक्यात यापूर्वी गेल्याच महिन्यात रामकृष्ण गाढवे व काशीनाथ गाढवे यांच्या शेतात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.
3 / 5
परशुराम गाढवे यांच्या गट नंबर 632 व 33 मध्ये आग लागली. शेतकरी गाढवे यांनी घरातील सामान लगबगीने बाहेर काढले. जनावरांच्या गोठ्यातील जनावरे चपळाईने सोडून त्यांचा जीव वाचवला.
4 / 5
गाढवे यांच्या शेतातील घरात गॅस सिलिंडर होते. मात्र, ते बाहेर काढले. अन्यथा अनर्थ घडला असता. वीज वितरणचे सहाय्यक अभियंता धोरणकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून पंचनामा केला.
5 / 5
गेल्या वर्षी देखील गाढवे यांच्या शेतातील ऊस जळाल्याची घटना घडली होती. त्यावेळी परिसरात दोन वेळा विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर ऊस जळून भस्मसात झाला होता.