निफाड : निफाड (Niphad) तालुक्यातील शिंगवे येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. पुराच्या पाण्यात 9 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू (Death) झाल्याचे कळते आहे. रोहित कटारे असे या 9 वर्षीय मुलाचे नाव असून पुराच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. शिंगवे परिसरात नदीच्या पुराचे पाणी (Water) वीट भट्टी परिसरात घुसल्या वीट भट्टी जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पुराचा अंदाज न आल्याने हा चिमुकला खड्यात पडला आणि जागीच या मुलाचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्हात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाककडून जिल्हातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. सुरगाण्याच्या गुलाबीगाव अर्थात भिंतघर येथील दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना समोर आलीय.
पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतामध्ये जनावरेही अडकून पडली आहेत. निफाडमध्ये रोहित कटारे हा 9 वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रोहितला आपला जीव गमवावा लागला आहे. रोहितच्या मृत्यूनंतर निफाड शहरामध्ये शोकाकुल पसरला आहे.