धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांना ॲडमिट न करण्याचा फैसला, नेमकं कारण काय?

| Updated on: Jun 01, 2021 | 7:19 PM

शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याच आवाहन करण्यात आलंय. Nashik Private Hospital doctors

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांना ॲडमिट न करण्याचा फैसला, नेमकं कारण काय?
Corona
Follow us on

नाशिक: शहरातील खासगी रुग्णालयांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उद्यापासून कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यात येणार नाही, असं पत्र खासगी रुग्णालयांनी काढलं आहे. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, यामागे दुसरं कारण असल्याची चर्चा सुरु आहे. (Nashik Private Hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow )

नाशिकच्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार नाही

नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांनी उद्यापासून कोव्हिड रुग्ण दाखल करून घेणार नाही असा निर्णय घेतला आहे. खासगी डॉक्टरांनी पत्र काढून निर्णयाची माहिती दिली आहे.

रुग्ण संख्या कमी झाल्याचं कारणं

नाशिकमधील खासगी रुग्णालयांनी शहरातील कोरोना रुगणसंख्या कमी झाल्याचं सांगितलं आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याच आवाहन करण्यात आलंय.

नेमकं कारण काय

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं कोरोना रुग्ण दाखल करुन घ्यायचे नाहीत असा निर्णय खासगी रुग्णालयांनी घेतल्याचं कळवण्यात आलं आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या निर्णया मागचं खर कारण वेगळं असल्याची चर्चा आहे.

महापौरांचा खासगी रुग्णालयांना इशारा

नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले होते. वाढीव बिलाबाबत तक्रार असल्यास आता हॉस्पिटल विरोधातील तक्रार थेट महापौरांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. नाशिक मधील अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात महापौर आक्रमक झाले होते. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिलामध्ये तफावत आढळल्यास थेट रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

महापौर निवासस्थानी हेल्पलाईन सेंटर स्थापन

खासगी रुग्णालयांच्या बिलांसदर्भातील काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास महापौरांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी महापौरांच्या निवासस्थानी हेल्पलाईन सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. नागरिकांनी हेल्पलाईन सेंटरशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयांच्या बिलांमध्ये तफावत आढळेल त्यांच्यावर मान्यता रद्दची कारवाई करु, असा इशारा देखील कुलकर्णी यांनी दिला आहे.

महापौरांचा रुग्णांची लूट थांबण्याचा इशारा

दरम्यान दुसरीकडे नाशिकच्या महापौरांनी यापूर्वीच खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेली रुग्णांची लूट तात्काळ थांबवावी.अन्यथा हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी रुग्णालयांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

नाशिकच्या वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी होणार, वेळ पडल्यास मान्यताही रद्द करु- महापौर

(Nashik Private Hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow )