नाशिकः बेरोजगारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. नाशिकमध्ये जिल्हा सैनिकी वसतिगृहात काही पदावर नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
ही पदे भरली जाणार…
जिल्हा सैनिकी वसतिगृहातील मुलांच्या वसतिगृहात वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, पहारेकरी, स्वयंपाकी, सफाई कर्मचारी ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरली जाणार आहेत. तर मुलींच्या वसतिगृहासाठी सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका, पहारेकरी, स्वयंकपाकी, सफाई कर्मचारी ही पदे भरली जाणार आहेत. या वसतिगृहात अशी एकूण 16 पदांची भरती केली जाणार आहे.
असे करा अर्ज…
जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यातील त्र्यंबकरोड येथील सैनिकी मुले व मुलींच्या वसतिगृहाकरीता अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. याकरिता इच्छुक व पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नी यांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे असे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी कळविले आहे. वसतिगृहाकरिता तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी इच्छुक व पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नी यांनी जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253-2577255 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
ही पदे भरली जाणार…
सैनिक मुलांचे वसतिगृह,नाशिक
क्र – पदाचे नाव – पद संख्या – मानधन
1 – वसतिगृह अधीक्षक – 01 (पुरुष) जेसीओ – रु.12,872/-
2 – सहाय्यक वसतिगृह अधीक्षक – 01 (पुरुष) – रु.9,902/-
3 – पहारेकरी – 01 (पुरुष) – रु. 8,911/-
4 – स्वयंपाकी – 05 (महिला) – रु. 5,941/-
5 – सफाई कर्मचारी – 02 (पुरुष) – रु. 5,658/-
सैनिक मुलींचे वसतिगृह, नाशिक
क्र – पदाचे नाव – पद संख्या – मानधन
1 – सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका – 01 (महिला) – रु.9,902/-
2 – पहारेकरी – 01 – रु. 8,911/-
3 – स्वयंपाकी – 03 (महिला) – रु. 5,941/-
4 – सफाई कर्मचारी – 01 (महिला) – रु. 5,658/-
जिल्ह्यातील त्र्यंबकरोड येथील सैनिकी मुलां व मुलींच्या वसतिगृहाकरीता अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
– ओंकार कापले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
Nashik Corona| कोरोना लस घेतल्याशिवाय सप्तश्रृंगीचे दर्शन नाही; इतरही नियम कडक, जरूर जाणून घ्या…!
Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?