नाशिक : इगतपुरीच्या मुंढेगाव येथील आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांवर सध्या शासकीय रुग्णालयातील स्वतंत्र चाईल्ड वॉर्डमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
दरम्यान या 15 विद्यार्थ्यांमध्ये 14 मुले तर एका मुलीचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने एक स्वतंत्र टीम उभी केली आहे. त्यात कायमस्वरुपी एक डॉक्टर, 2 परिचारिका, 2 सफाई कर्मचारी त्यासोबत आश्रमशाळेतील एक शिक्षक आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड सेंटरमधील या विद्यार्थ्यांना प्राचार्य रणवीर जहागीरदार हे योगासनांचे प्रशिक्षण देत असून, त्यांच्याकडून नियमित व्यायाम देखील करून घेत आहेत. तसेच त्यांच्या जेवनाची देखील चांगली व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना सकस आहार पुरवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती आश्रम शाळेच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे राज्याची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. कोरोनाचा हा नवा विषाणू अधिक वेगाने पसरणारा असल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, घरी गेल्यानंतर हात साबनाने स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच योग्य ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!