नाशिक: नाशिकमध्ये आजपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला. यावेळी छगन भुजबळांनी ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ असं सांगत वाहनचालकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं. (‘No helmet no petrol’ campaign start in nashik)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले- श्रींगी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पेट्रोल डिलर संघटनेचे अधिकारी आदि उपस्थित होते. आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालविताना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळांनी केले.
गेल्या पाच वर्षात शहरात 782 अपघातात 825 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये 467 जण हे दुचाकीस्वार असून त्यापैकी 397 जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा उपक्रम स्तुत्य असून, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, असं ते म्हणाले. हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षत घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नागरिकांच्या हितासाठी शासन योजना व मोहिम राबवित असते. त्या अनुषंगानेच जिल्ह्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलिसांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी व्यक्त केला.
या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करण्यात आले आहेत. भुजबळांच्या हस्ते उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची आमदार सरोज अहिरे व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून सुरूवात केली आहे. यावेळी हेल्मेट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करून, हेल्मेट वापरण्याचे आवाहन शहरातील सर्व नागरिकांना केले आहे. (‘No helmet no petrol’ campaign start in nashik)
VIDEO: MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2021https://t.co/7POFZnmfmb#MahafastNews100 #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2021
संबंधित बातम्या:
रिक्षाचालकाने घरात घुसून महिलेला पेटवलं, वाचवताना बहीणही भाजली, नाशकातील घटनेने खळबळ
(‘No helmet no petrol’ campaign start in nashik)