उमेश पारीक, लासलगाव, नाशिक | 2 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत होते. देशभरात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलो दराने कांदा काही दिवसांपासून विकला जात आहे. कांदा चाळीत साठवलेल्या कांदाही संपत आल्यामुळे दरात वाढ झाली होती. कांद्याची किंमत 100 रुपयांवर जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. दिवाळीच्या सणाच्या काळात कांद्याचे दर वाढणार असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य दर 800 डॉलर प्रति टन केले. त्यामुळे कांदाच्या दरात घसरण सुरु झाली. त्यातच नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे आवक वाढून कांद्याचे दर घसरले आहे.
पुढील आठवड्यापासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद राहणार आहे. दिवाळी सणामुळे 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक वाढली. त्याचवेळी कांद्याचे दर वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य 800 डॉलर प्रति टन केले. त्याचा परिणाम कांद्याच्या दरात घसरणीवर झाला. दरम्यान केंद्र सरकारने लावलेल्या निर्यात शुल्काला शेतकरी, शेतकरी संघटना कांदा उत्पादकांनी प्रचंड विरोध होत आहे. सरकारने लावलेले निर्यात शुल्क त्वरित मागे घेण्याची मागणी केली जात आहे.
नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांद्याची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. किरकोळ बाजारात पंचवीस रुपये दराने कांद्याची विक्री करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांत कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने 725 रुपयांची घसरण झाली. आता कांद्याची दर 4 हजार 200 रुपयांपर्यंत खाली आले आहे. सध्या लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटलची कांद्याची आवक आहे. म्हणेज गेल्या पाच दिवसांत पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांचा फटका बसला.