नाशिकः सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सात दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिन्नर, निफाड आणि येवल्यात सातत्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तालुक्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसरी लाट तूर्तास तरी येण्याची शक्यता नाही, असे मानून राज्य सरकारने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू केल्या. विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मात्र, सिन्नर तालुक्यातील रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पांगरी येथील शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोबतच संत हरिबाबा विद्यालय येत्या अकरा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पांगरीत सध्या कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या जिल्ह्यात सिन्नर, निफाड, येवल्यात तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथे रुग्ण वाढणे कमी झाले नाही, तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच या शहरातील हॉटस्पॉट शोधून चाचण्या वाढवा. तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करा. कठोर निर्बंध लावण्याची वेळ आणू नका, असा इशाही भुजबळांनी दिला आहे.
नगरमुळे वाढतायत रुग्ण
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
दर्शनाचे नियम कडक
कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.
इतर बातम्याः
भुजबळ-कांदे वादानंतर आता आणखी दोन बडे नेते आमनेसामने, नाशिकमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला
नोकरीची चिंता सोडा आणि ‘हा’ व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान, महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न https://t.co/k6t5vpCHxO #Job #FishFarming #Business #Investment
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021