नाशिकमध्ये पुन्हा तणाव वाढला, पोलिसांकडून लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु

| Updated on: Aug 16, 2024 | 5:03 PM

नाशिकमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून तणाव निवाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जातोय. पण परिस्थिती जास्त चिघळण्याची भीती निर्माण झाल्यामुळे पोलिसांकडून पोलीस बळाचा वापर करण्यात आला. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

नाशिकमध्ये पुन्हा तणाव वाढला, पोलिसांकडून लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
Follow us on

नाशिकमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती निवाळण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज सुरु झालाय. नाशिकमध्ये आज दुपारी दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी परिस्थिती निवाळण्यात पोलिसांना यश आलं होतं. पण वातावरण शांत झाल्यानंतर आता पुन्हा नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जातोय. यामुळे पोलिसांना आता बळाचा वापर करावा लागतोय. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. शहरात पोलिसांकडून प्रत्येक बाकरी गोष्टीकडे लक्ष आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाकडून नाशिक शहर बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाच्या या बंदला आज व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी नाशकात चांगला प्रतिसाद दिला. नाशिकमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याराच्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा आज दुपारी काढण्यात आला. हा मोर्चा नाशिकच्या भद्रकाली परिसरात आला तेव्हा काही दुकानं उघडी होती.

आंदोलकांनी दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदार दुकान बंद करण्यास तयार नव्हते. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील शांततेचं आवाहन केलं. यानंतर परिस्थितीत नियंत्रणात आली होती. पण अचानक संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नाशिकमधील परिस्थिती बिघडली. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

हे सुद्धा वाचा