मालेगाव: कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मालेगावातील यंत्रमाग उद्योग सुरु झाला आहे. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने या उद्योगावर मंदीचे सावट आले आहे. तयार कापडाला उठाव नसल्यामुळे सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. या बंदचा सर्वात जास्त फटका कारखान्यात काम करणाऱ्यांना कामगारांना बसत आहे. (Power looms in Malegaon shut down again due to no demand for clothes in market)
मालेगावात दररोज सुमारे दीड कोटी मीटर कापड तयार केले जाते. मात्र तयार करण्यात आलेल्या या कापडाला उठाव नाही. तसेच सुताच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कारखाने चालवणे कठीण झाले आहे. शासनाने वीज बिलात सवलत द्यावी. तसेच कच्च्या मालावरील जीएसटी कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी यंत्रमाग असोशिएशनने केली आहे.
कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील व्यापारी समाजाने आता पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यातील व्यापाऱ्यांनी (Traders) ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात व्यापाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Traders wrote letter to PM Narendra Modi)
ज्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना कोविड काळातील 50 टक्के व्याज माफ व्हावे. तसेच 50 लाखांपेक्षा जास्तीच्या कर्जासाठी तीन महिन्यांचे व्याज माफ करा. लघू उद्योजकांना एसएमई युनिट जारी करावे आणि व्यापाऱ्यांना जीएसटीचा परतावा द्यावा, अशा मागण्या या पत्रातून करण्यात आल्याचे एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
मोठी बातमी: महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची मदतीसाठी पंतप्रधान मोदींकडे धाव
(Power looms in Malegaon shut down again due to no demand for clothes in market)