मालेगाव | 13 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज मालेगावात दाखल झालीय. यावेळी मालेगावात मोठी रॅली काढण्या आली. यावेळी राहुल गांधी यांनी एका चौकावर थांबून भाषण केलं. यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि नागरीक त्यांच्यासोबत बघायला मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडायला आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांचं आज मालेगावात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यामुळे राहुल गांधी भर ऊन्हात अतिशय जोशात भाषण करताना दिसले. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचं लक्ष्य दुसरीकडे वळवत आहेत. कारण त्यांना माहिती हिंदु्स्थानाचं धन 10-15 लोकांच्या खिशात जावं. भारतात सर्वात श्रीमंत 22 लोक आहेत. त्यांच्याकडे देशातील 70 कोटी जनतेकडे जितका पैसा आहे तितका पैसा आहे. ही हिंदुस्तानची अवस्था आहे. मीडिया, विमानतळ, पोर्ट्स, पावरजनरेशन, सेल्फफोन जिथे बघाल तिथे हेच 25 लोक दिसतील. तुम्ही मोबाईल पाहतात, रिल्स बघतात, पैसे कोण बनवतं, गाडीत पेट्रोल टाकता, पैसे कोण कमवतं? रस्त्यावर चालतात, पैसे कोण कमवतं? विजेचा दर वाढतो, पैसे कोण कमवतो? प्रत्येक ठिकाणी तेच 20-25 लोक पैसे कमवतात”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
“भारतात महत्त्वाचे फक्त तीन प्रश्न आहेत. पहिला महिने बेरोजगारी, दुसरा महागाई आणि तसरा भागीदारी. भारताचं धन भागीदारीमध्ये जातंय. महागाई आणि बेरोजगारीने आपण सर्व सामना करतोय. विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, 5 ते 10 खर्च होतात. पण हिदुस्तानात नोकरी मिळत नाही. कारण छोटे व्यापाऱ्यांचे काम बंद झालंय. इथे पावरलूम बंद पडले. छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीने संपवून टाकलं”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.
“नरेंद्र मोदी यांनी अदानी सारख्या अब्जाधीशांसाठी काम केलं. या अब्जाधीशांनी मोदींना सांगितलं की, तुमचा चेहरा टीव्हीवर हवा, असं वाटत असेल तर जीएसटी, नोटबंदी लागू करा आणि हिंदुस्तानातील छोट्या व्यावसायिकांना संपवा. मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. रोजगार इथे पावरलूममध्ये मिळतो. रोजगार छोटे व्यापारी देतात. पण त्यांना सर्वांना नरेंद्र मोदी यांनी संपललं आहे. या देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही”, असं राहुल गांधी मिळाले.