ओव्हरटॅक करण्याच्या नादात मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ड्रायव्हर-क्लिनर गंभीर जखमी

| Updated on: Aug 23, 2021 | 7:33 PM

मुंबई-नाशिक महामार्गावर एका गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

ओव्हरटॅक करण्याच्या नादात मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ड्रायव्हर-क्लिनर गंभीर जखमी
Follow us on

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावर एका गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Serious accident on Mumbai-Nashik highway due to overtaking, driver-cleaner injured)

नाशिकवरुन मुंबईच्या दिशेने जाताना मोठा अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर कुमार गार्डन हॉलजवळील ब्रिजवर एका आयशर गाडीला भीषण अपघात झाला आहे. एक नवीन आयशर गाडी नाशिकवरुन मुंबईच्या दिशेने जात असताना पाठीमागून ओव्हरटॅक करण्याच्या नादात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने गाडीला कट मारला. त्यानंतर ती गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. त्यामुळे मोठा अपघात घडला.

रुग्णालयात उपचार सुरु

या अपघातात वाहन चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाली आहे. सध्या त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान सध्या पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहे.

इतर बातम्या

आठ लाखांचे लाच प्रकरण, शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांना जामीन मंजूर, पण कोर्टाच्या अटी-शर्ती

पोलिसांच्या 12 टीम, चार शहरांमध्ये तपास, नालासोपाऱ्यातील ज्वेलर्स मालकाची भर दिवसा हत्या करणाऱ्या दरोडेखोरांना बेड्या

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तरुणाची सुसाईड नोट, पण त्याआधी पत्नीचा फिनायल पिवून आत्महत्येचा प्रयत्न

(Serious accident on Mumbai-Nashik highway due to overtaking, driver-cleaner injured)