चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी दादा भुसे थेट नातींना घेऊन माध्यमांसमोर, पाहा व्हिडीओ

| Updated on: Aug 19, 2023 | 7:01 PM

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गुप्त भेटीची बातमी समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांकडून या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी दादा भुसे आपल्या नातींना कडेवर घेऊन माध्यमांसमोर आले.

चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी दादा भुसे थेट नातींना घेऊन माध्यमांसमोर, पाहा व्हिडीओ
Follow us on

नाशिक | 19 ऑगस्ट 2023 : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गुप्त भेटीची बातमी समोर आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या दोन्ही नेत्यांनी गुप्त भेटीच्या वृत्ताचं खंडन केलंय. पण सूत्रांनी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आपण आदित्य ठाकरे यांची भेट घेतली नाही हे सांगण्यासाठी दादा भुसे माध्यमांसमोर थेट नातींना घेऊन समोर आले.

आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकला आलो असल्याचं दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते आपल्या दोन्ही नातींना कडेवर घेऊन माध्यमांसमोर भूमिका मांडायला आले. “आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा विषयच नाही. माझी विनंती आहे की, एक छोटीसी कल्पोकल्पित बातमीसुद्धा चुकीची दिशा देते. अहो, काय विषय नाही. कुठे उपचाराला गेलो. दुपारी 12 वाजेपासून 4 वाजेपर्यंत आपल्यासोबत आहे. त्यानंतर मी इथे आलो. यापलिककडे आणखी काय सांगायचं?”, असं दादा भुसे म्हणाले.

“मी सकाळी मुंबईहून निघालो. दुपारी बारा वाजता नाशिकला आलो. मला वाटतं मी बारा वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषदही घेतली. दुपारी दोन ते चारच्या दरम्यान मराठा विद्या प्रसारक संस्थेचाल आज समाजदिवस म्हणून साजरा केला जातो. त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली. हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता”, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

“हा कार्यक्रम संमपल्यानंतर मी माझ्या खाजगी गाडीतून नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलो. तिचा आज पहिल्या वाढदिवस होता. मालेगाव तालुक्यात पाऊस कमी आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही मालेगावात वाढदिवस साजरा न करता मालेगावात कुटुंबियांना बोलावून घेतलं. इथे छोटेखानी आम्ही कार्यक्रम करतोय”, असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, दादा भुसे यांच्यासोबत गुप्त भेटीच्या वृत्तावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “नाही. ते खरंच तिथे होते? आपण सगळे तिथे होता. अशी छुपे भेट नाही किंवा हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही. मुख्य गोष्ट ही होती की, अनेक दिवसांपासून मला त्या रिसॉर्टला भेट द्यायची इच्छा होती. इथल्याच व्यक्तीने ते रिसॉर्ट बनवलं आहे. मला ते बघायचं होतं”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

“मी पर्यटन मंत्री होतो तेव्हापासून या रिसॉर्टबद्दल ऐकत होतो. आज संधी मिळाली. मध्य मी एका लग्नासाठी आलो होतो. या रिसोर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन एकत्र केलं आहे. म्हणून मी ते बघायला गेलो. छुप्या भेटींची गरज नाही. जे आहेत जगजाहीर असतं”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.