“सावरकर आमचे दैवत, त्यामुळे..”, भर सभेत राहुल गांधी यांना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं!

| Updated on: Mar 26, 2023 | 9:23 PM

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या मालेगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार टीका केली. त्यासोतच यावेळी बोलताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीरपणे सावरकरांच्या मुद्द्यावरून ठणकावून सांगितलं आहे.

सावरकर आमचे दैवत, त्यामुळे.., भर सभेत राहुल गांधी यांना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं!
Follow us on

नाशिक : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या मालेगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार टीका केली. त्यासोतच यावेळी बोलताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीरपणे सावरकरांच्या मुद्द्यावरून ठणकावलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर त्यांनी माफी माागायला मी काही सावरकर नाही. माझं आडनाव गांधी आहे, असा पुनोरच्चार करत भाजपला डिवचलं होतं. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांना मला एक सांगायचं आहे, त्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलात आम्हीसुद्धा त्यामध्ये सहभागी झालो होतो. पण आज राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय की ही लढाई लोकशाहीची आहे. कृपा करून नाहीतर जाहीपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो तो पण त्यांनी 15 वर्षांच्या वयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूला चाफेकरांच्या मारेकरांना मारत मारत मरेल अशी त्यांनी शपथ घेतली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

14 वर्षे रोज मरणयातना चाबकाचे फटके हे सुद्धा एकाप्रकारे बलिदान आहे. जसं क्रांतीकारकांनी गोळ्या खालल्या, फाशीवर गेले त्यासारखेच 14 वर्षे मरणयातना सोसणं येड्या गबाळ्याचं काम आहे. त्यामुळे मी राहुल गांधी यांना सांगतोय की आपण देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत त्याला फाटे फुटु देऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही, तर…’

“मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन करायचं? पंधरा दिवसांपूर्वी खेडला अतिविराट सभा होती. अभूतपूर्व असं ते दर्शन होतं. आजची सभा अथांग पसरलेली आहे. संजय राऊत आपण जे म्हणात ते बरोबर आहे. आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काही नाही तरीदेखील एवढी गर्दी ही सगळी पूर्वजांची पुण्यायी. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय आपण शपथ घेतली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढायचं. आता एकच जिंकेपर्यंत लढायचं”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.