नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 841 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाने आज शनिवारी दिली. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 56 ने घट झाली आहे. जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 633 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे , जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी सांगितले आहे.
नाशिक ग्रामीणमध्ये सध्या नाशिकमध्ये 70, बागलाण 7, चांदवड 34, देवळा 9, दिंडोरी29, इगतपुरी 3, कळवण 10, मालेगाव 10, नांदगाव 10, निफाड 135, सिन्नर 130, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 6, येवला 79 अशा एकूण 533 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 286, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 15, तर जिल्ह्याबाहेरील 7 रुग्ण असून असे एकूण 841 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 120 रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.21 टक्के, नाशिक शहरात 98.14 टक्के, मालेगावमध्ये 97.06 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 173, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 990 मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
इतर बातम्याः
नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी
नको, नको म्हणतानाही बहाद्दराने पुरात घातली गाडी; नाशिकमधली चित्तथरारक घटना!
दसऱ्याच्या तोंडावर खूशखबर, सोनं पुन्हा झालंय स्वस्त!https://t.co/h84MpZB4dn#Nashik|#bullion|#market|#gold|#silver
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021