नाशिक : कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था आणि श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर राज्यस्तरीय नाशिक भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘टीव्ही 9 मराठी’चे नाशिकचे वरिष्ठ प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांना ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. निष्पक्ष पत्रकारिता आणि राजकीय विश्लेषण यासाठी चंदन पूजाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या संपूर्ण टीव्ही 9 टीमला समर्पित करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार प्राप्त झाल्यावर चंदन पूजाधिकारी यांच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.