नाशकासाठी अतिवृष्टीचा अलर्ट, जिल्ह्याला पावसाने झोडपले

| Updated on: Sep 08, 2021 | 1:25 PM

नाशिक (Nashikrain) शहर आणि जिल्ह्याला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने (Heavyrain) झोडपले. त्यामुळे अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, नाशकात आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

नाशकासाठी अतिवृष्टीचा अलर्ट, जिल्ह्याला पावसाने झोडपले
नाशिकमध्ये पावसाची हजेरी.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashikrain) शहर आणि जिल्ह्याला मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने (Heavyrain) झोडपले. त्यामुळे अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, नाशकात आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Warning of torrential rain to Nashik, Dhule, Nandurbar districts)

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मंगळवारी रात्री जिल्ह्यासह नाशिक, मनमाड, नांदगाव, ओझरला जोरदार पाऊस झाला. राज्यात गुरुवारपर्यंत (10 सप्टेंबर) पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात नाशिकसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक मोठे व छोटे जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात होणारा पाऊस हा समाधानकारक ठरल्यास पाणी कपातीचे संकट जाणवणार नाही.

कडवा ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील कडवा धरण मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पाणी चिंता मिटली आहे. सिन्नरसाठीची पाणीपुरवठा योजन या धरणातून आहे. मंगळवारी दुपारी कडवा नदीत 150 क्यूसेक विसर्ग सुरू होता. 1924 दलघफू क्षमतेच्या कडवा धरणावर 88 किमी लांबीचा कालवा असून त्यामुळे इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड तालुक्यातील एकूण 19404 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

मनमाडला तासात 21 मिमी

मनमाड शहराला मंगळवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. एका तासात सुमारे 21 मिमी पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फायदा होणार आहे.

चक्रीय चक्रावाताने पाऊस

सध्या दक्षिण छत्तीसगढ आणि आसपासच्या परिसरात चक्रीय चक्रवात स्थिती आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. राज्यात आठ आणि नऊ सप्टेंबर हे दोन दिवस जोरदार पावसाचे सांगण्यात आले आहेत. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला अतिवृष्टीचा हाय ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Warning of torrential rain to Nashik, Dhule, Nandurbar districts)

इतर बातम्याः

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी

खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालक आक्रमक, बेरोजगारीच्या भीतीने नाशिकमध्ये बेमुदत बंदची हाक