नाशिकः विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
14 डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021-2022 या वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून वेळेत सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
ही दक्षता घ्या…
ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करू नये. तसेच नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त यूजर आयडी तयार केल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असेही सहाय्यक आयुक्तांकडून कळवण्यात आले आहे.
नव्याने अर्ज करण्यासाठी
– MahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
– पोर्टलवर लॉग इन व्हा.
– तुमचे प्रोफाइल तयार करा.
– ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करू नये.
– सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, माहिती विभाग
Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध
अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!