Navi Mumbai : नवी मुंबईचा पाणी प्रश्न पेटला, पाणी प्रश्नांवरून शेकापचं सिडको अधिकाऱ्यांसमोर हंडा घेराव आंदोलन
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत.
1 / 5
नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटला आहे. मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय.अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त झालेत
2 / 5
अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा याविरोधात शेकापकडून हंडा आंदोलन करण्यात आलं. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलकांनी यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शिवाय आमच्या मागण्या लवकरात लवकर पू्र्ण कराव्यात असंही आंदोलक म्हणाले.
3 / 5
नागरिकांसोबतच शेकापनं हे आंदोलन केलं. उलवे नोडमध्ये होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. "आम्ही नियमित पाणीपट्टी (देयक) भरतो, मग आम्हाला आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही? आमच्या हक्काचे पाणी विकून सिडकोने बेकायदा धंदे करणे बंद करावे, नियमित उच्च दाबाने पाणी मिळालेच पाहिजे", अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
4 / 5
यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांना शेकापच्या महिला कार्यकर्त्यांनी हंड्यासह घेराव घातला. हा मोर्चा शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्वत: शेकापच्या कार्यालयात येऊन निवेदन स्वीकारत सोमवापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
5 / 5
लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर तसं झालं नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा यावेळी शेकापच्या वतीने देण्यात आला. पुढचं आंदोलन सिडको अधिकाऱ्यांच्या दालनात करू, असंही यावेळी आंदोलकांनी म्हटलं.