हरीहरेश्वर: रायगड (Raigad Boat) येथील हरीहरेश्वरच्या (Harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. फक्त ही बोट आढळलेली नाही तर या बोटीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहीहंडी (dahi handi) आणि गणेशोत्सवाच्या तोंडावरच शस्त्रास्त्राने भरलेली ही बोट सापडल्याने अधिकच खळबळ उडाली होती. या मागे काही घातपात तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे यामुळे या परिसरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील लॉज आणि हॉटेलवर छापेमारी करण्यात येत आहे. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. या शिवाय किनाऱ्यावर येणाऱ्या बोटींची तपासणी केली जात आहे. एटीएसने आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. एटीएसचं नवी मुंबई युनिट या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, या घटनेत कोणताही दहशतवादी अँगल नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
संशयास्पद बोट आढळल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यावर उत्तर दिलं. या बोटीचं नाव लेडी हॅन आहे. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. या बोटीत तीन एके-47 रायफल आणि काही जिवंत काडतूसे सापडली आहेत. या बोटीत काही कागदही सापडले आहेत. मात्र, यात कोणताही दहशतवादी अँगल नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही बोट तुटलेल्या अवस्थेत सापडली आहे. या महिलेचा पती जेम्स हॉबर्ट या बोटीचा कॅप्टन आहे. ही बोट 26 जून 2022 रोजी यूरोपातून मस्कतला जात होती. मात्र बोटीचं इंजिन फेल झालं. त्यानंतर या बोटीवरील लोकांनी मदत मागितली. त्यानंतर कोरियाच्या युद्धपोतनेही रेस्क्यू ऑपरेशन केलं. त्यानंतर त्यांना ओमानला हँडओव्हर केलं. मात्र, ही नाव काढली जाऊ शकत नव्हती, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ही बोट हरीहरेश्वरच्या तटावर सापडली आहे. स्थानिक पोलीस आणि एटीएसचं पथक याचा तपास करत आहे. मात्र, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजूनपर्यंत दहशतवादी षडयंत्राचा अजूनपर्यंत कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु, चौकशी सुरू आहे. आम्ही कोणताही अँगल नाकारत नाही. मात्र, यात दहशतवादी अँगल नाही हे सुद्धा खरे नाही. बोटीत शास्त्रास्त्रे का ठेवण्यात आले होते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांच्या मते, बोटीवर सापडलेले हत्यारे दुबईतील Privately Contracted Armed Maritime Security (PCAMS) कंपनीतून खरेदी करण्यात आले होते. ही नाव युकेत रजिस्टर्ड करण्यात आली होती. ती ओमानवरून युरोपला जात होती. ही बोट खूप स्लो चालते. त्यामुळे बोटीत छोटी हत्यारे ठेवण्याची परवानगी दिली होती. जेव्हा बोटीतील लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. तेव्हा ते आपल्यासोबतची हत्यारे घेऊन जाऊ शकले नाहीत. दरम्यान, हत्यारे सापडल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी PCAMS कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांना शस्त्रांस्त्रांचा क्रमांक सांगितला. ज्या बॉक्समध्ये ही हत्यारे सापडली त्या बॉक्सवर Neptune Maritime Security Limited कंपनीचा लोगो लावण्यात आला होता. शिपिंग, तेल आणि गॅस उद्योगांना सुरक्षा देण्याचं काम ही कंपनी करते.