आनंदाची बातमी: सिडकोच्या योजनेतून कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार

| Updated on: Aug 14, 2021 | 11:05 AM

Corona Warriors | या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील करोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये 4488 घरे उपलब्ध करून देण्यात येतील.

आनंदाची बातमी: सिडकोच्या योजनेतून कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी मुंबई: गेल्या दीड वर्षापासून राज्यातील कोरोना संकट परतवून लावण्यासाठी अवितरपणे झटणाऱ्या कोरोना योद्धयांसाठी सिडकोने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना (Corona Warriros) नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत. कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेत कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील करोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये 4488 घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच परिसरांमध्ये ही घरे असतील.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

एकूण 4488 घरांपैकी 1088 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, ईडब्लूएस आणि उर्वरित 3400 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत.

https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावरून या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती, घरांचा तपशील, विविध प्रवर्गांकरिता राखीव घरे, अनामत रक्कम, योजनेचे वेळापत्रक इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.

संबंधित बातम्या:

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

नवी मुंबईत कोरोना योद्धे पोलिसांसाठी विशेष कोव्हिड केअर सेंटर, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून उद्घाटन

कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या होमगार्डचं मानधन थकलं, नाशिकच्या 400 जणांवर आर्थिक संकट