मुंबई : मुंबईत (Mumbai) दिवसागणिक कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असून दिवसभरात फक्त 29 रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. यात वेगळी बाब म्हणजे एकाही मृत्यू सापला नसल्याने मुंबईतील कोरोना अटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मुंबई पालिकेनं आज 8 हजार 708 कोरोना रुग्णांच्या चाचण्या केल्या आहेत. राज्यात (State) मुंबईमध्ये आता कोरोना अटोक्यात येत असल्याचं दिसत असून मुंबईकरांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे. नव्याने आढळलेल्या 29 पैकी 27 जणांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही आहेत. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आकडेवारीनुसार एकही रुग्ण ऑक्सिजन बेडवर नाही. राज्यातील कोरोना आकडेवारी पाहिल्यास राज्यात 113 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सगळ्यांना कोरोनाचा धारावी पॅटर्न तर माहितच आहे. यात आता धारावीमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दादर, माहीम आणि धारावीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीचा कोरोनामुक्ती पॅटर्नही सर्वात माहीत आहे. धारावीत सक्रीय रुग्णांची संख्या एक आकडी झाली आहे. धारावीमध्ये 1, माहीममध्ये 2, दादरमध्ये 2 सक्रिया कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 300 केंद्रावर करण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबईतील फक्त 12 केंद्रावर प्रायोगिक तत्वावर लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात 16 मार्चपासून लसीकरण लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आजपासून 300 लसीकरण केंद्रावर 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. महापालिकेकडे कर्बेव्हॅक्स लसीचे एक लाख 20 हजार डोस असून ते सर्व डोस वितरित केले जाणर आहे.
Another step for a healthier Mumbai!
BMC proudly collaborates with @projectmumbai1 & @joshishishir to launch #AtYourSchoolDoorstep vaccination for ages 12 complete to age 14. School principals can avail of this free service by sending an e-mail on highschoolvaccination@gmail.com pic.twitter.com/wmP81bY8ml— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 20, 2022
मुंबईत कोरोनाच्या नव्याने आढळलेल्या 29 पैकी 27 जणांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही आहेत. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आकडेवारीनुसार एकही रुग्ण ऑक्सिजन बेडवर नाही. मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून दिवसभरात फक्त 29 रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. यात वेगळी बाब म्हणजे एकाही मृत्यू सापला नसल्याने मुंबईतील कोरोना अटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मुंबई पालिकेनं आज 8 हजार 708 कोरोना रुग्णांच्या चाचण्या केल्या आहेत.
इतर बातम्या