Navi mumbai : राज्यात सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

| Updated on: Dec 18, 2021 | 7:19 PM

नवी मुंबईतील प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे राज्यात 5000 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे सत्तर हजार जाणांनानोकरीची संधी मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

Navi mumbai : राज्यात सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
Follow us on

नवी मुंबई : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यात 5000 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे सत्तर हजार जाणांनानोकरीची संधी मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढला

यावेळी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त, अशोक सुभेदार, ॲक्टिस इंडियाचे भागिदार आशिष सिंग, बिझनेस हेड अभिजीत माहेश्वरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण 80 टक्क्यांवर जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. राज्यात गुंतवणुकीला ओघ वाढत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यात जात नाही, आम्ही दुबई, युरोप सारख्या देशांत जातो. कोरोना काळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली. अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

असे असेल इंटेलियन पार्क

नवी मुंबईत सुमारे 47 एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. नवी मुंबईतील घणसोली स्टेशनसमोर हे इंटेलियन पार्क असेल. सुमारे 47.1 एकर आणि सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर हे पार्क असेल. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील हे एक मोठं पाऊल मानले जात आहे.

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

Video : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन, कर्नाटक सरकारला इशारा

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरला, शोध घेत मालक दाही दिशा फिरला..!