Navi mumbai : नवी मुंबईत महाविकास आघाडीचं ठरलं, या फॉर्म्युल्यावर एकत्र लढणार

| Updated on: Dec 16, 2021 | 2:38 PM

नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचेही कळतंय. ज्याला मागच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या त्यानुसार या निवडणुकीत जागावाटप होणार आहेत.

Navi mumbai : नवी मुंबईत महाविकास आघाडीचं ठरलं, या फॉर्म्युल्यावर एकत्र लढणार
नवी मुंबई पालिका
Follow us on

नवी मुंबई : राज्यात सध्या महानगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपालिकेंच्या निडणुकांचं बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्यासाठी त्यांचं नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

ज्याच्या जास्त जागा त्याप्रमाणे जागावाटप

नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचेही कळतंय. ज्याला मागच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या त्यानुसार या निवडणुकीत जागावाटप होणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत काय रणनिती असेल, यावर सविस्तर चर्चा झाली. जिथे जो उमेदवार निवडूण येईल तशा उमेदवाराला उमेदवारी देण्यासा प्रधान्य देणार असल्याची माहितीही समोर आली आहे. नवी प्रभागरचना आल्यानंतरही याबाबत आणखी काही महत्वाच्या बैठका पार पडणार असल्याची माहितीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी गणेश नाईकांना शह देणार?

आज नवी मुंबईतील महाविकास आघाडीची एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे, आणि एकत्र लढण्यावर एकमतही झाले आहे. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे , संदीप सुतार हे उपस्थित होते. भाजप नेते गणेश नाईक यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने हा नवा प्लॅन आखला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गणेश नाईक आणि भाजपसाठी हे कडवं आव्हान ठरणार आहे.

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

रुपालीताई धडाकेबाज, डॅशिंग नेत्या, पण…; अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

Bullock cart race | Maharashtra | बैलगाडा शर्यतीचे फायदे नेमके काय आहेत?