नवी मुंबई: आज सकाळपासूनच नवी मुंबई, ठाण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जोरदार पावसामुळे नवी मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. सकाळपासूनच पावसाने संततधार लावून धरल्याने रहिवाशांना बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. (navi mumbai and thane continue to receive heavy rain with thunderstorms)
गेल्या आठदिवसांपासून ठाणे, नवी मुंबईत पावसाने संततधार लावली आहे. आज सकाळपासून नवी मुंबईत पावसाने जोर धरला. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे येथील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं. दुपार झाली तरी नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू होता.
ठाण्यातही काल मध्यरात्रीपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कल्याण नजीक असलेल्या अंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. भिवंडी शहर व तालुक्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाची जोरदार सर तर रिमझिम संततधार सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, सलग 3 ते 4 दिवस मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. येत्या 24 तासात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सद्या तरी ढगाळ वातावरण असून वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा सामना करावा लागला आहे. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्यांमध्येही खड्डे आणि चिखल झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागत असल्याने प्रवाशांची प्रचंड हालत झाली आहे. गेल्या तासाभरांपासून प्रवाशांना खड्ड्यात अडकून पडावेल लागले आहेत. वाहतुकीची कोंडी, पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीतच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड चिडचिड झाली आहेत.
अनेकजण गणेशोत्सवानिमित्ताने नातेवाईकांकडे मुंबईला आले होते. दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर हे प्रवासी आपल्या नाशिकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आहे. अशातच त्यांना सकाळी सकाळीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने या प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. एक तास उलटला तरी या प्रवाशांना ठाण्याच्याबाहेर पडता आलेलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा पारा चढला आहे.
दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे. (navi mumbai and thane continue to receive heavy rain with thunderstorms)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 13 September 2021 https://t.co/rcDScOKSPv #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
संबंधित बातम्या:
भातसा धरण ओव्हर फ्लो, धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गणेशोत्सवात खाजगी वाहनांनी जादा भाडे आकारल्यास पनवेल आरटीओ करणार कारवाई
VIDEO: प्रवास खड्ड्यात! ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; 8 किलोमीटरच्या रांगाच रांगा
(navi mumbai and thane continue to receive heavy rain with thunderstorms)