नवी मुंबई : नवी मुंबईकरांनो, आजपासून पाणी जपून वापरा. कारण नवी मुंबईत (Navi Mumbai) आजपासून पाणीकपात (Water shortage) असणार आहे. मान्सून सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी अपेक्षित पाऊस अद्याप पडलेला नाही. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस न झाल्याने सिडको प्रशासनाने उद्यापासून शहरात 25 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. पाऊस (Monsoon Update) लांबला तर पाण्याची अडचण होऊ नये, यासाठी आधीच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ध्या नवी मुंबईत आजपासून पाणीकपात असणार आहे. मान्सून सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी अपेक्षित पाऊस अद्याप पडलेला नाही. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अपेक्षित पाऊस न झाल्याने सिडको प्रशासनाने उद्यापासून शहरात 25 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील नवी मुंबईत पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. पण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाणीकपात करण्यात आलेली नाही. मोरबे धरणात आतापर्यंत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाण्याची पातळी 77 मीटरपर्यंत आहे. त्यामुळे तिथे पाणीकपात करण्यात आलेली नाही.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर उरलेल्या अन्य भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोकडे आहे. खारघर, उलवे, तळोजा, कळंबोली, उरण, जेएनपीए वसाहत,द्रोणागिरी या भागांना सिडकोकडून हेटवणे धरण, नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण पाणी पुरवठा करतं.
मुंबई आजपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं धरणक्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मुंबईकरांना सतावू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागेल. आजपासून ही पााणीकपात लागू करण्यात येणार आहे.