पनवेल (रायगड) : रायगड जिल्ह्यात अद्यापही कोरोना परिस्थिती हवी तशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबावा यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारुन रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरात एक सराफ दुकान राजरोसपणे सुरु होतं. याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच तातडीने ज्वेलर्स दुकानावर कारवाई करण्यात आली (Panvel Municipal Corporation action against jewellers shop on violation of rules).
पनवेल मनपा हद्दीत आदेशाचे उल्लंघन करत खारघर सेक्टर 15 येथील स्वर्णगंगा ज्वेलर्स संध्याकाळपर्यंत सुरू असल्याने मनपाकडून कारवाई करण्यात आली आहे. खारघरचे वॉर्ड ऑफिसर जितू मडवी यांनी गंगा ज्वेलर्स सील करत कारवाई केली. अति पर्जन्यवृष्टी आणि कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दोन दिवस जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पनवेल मनपा रायगड हद्दीत येत असल्याने हे नियम पनवेललाही लागू आहेत. त्यामुळे महापालिकेने ज्वेलर्सवर कारवाई केली (Panvel Municipal Corporation action against jewellers shop on violation of rules).
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अद्याप हवी तशी नियंत्रणात आलेली नाही. रायगडमध्ये गुरुवारी (11 जून) दिवसभरात 561 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 546 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच 24 जणांनी कोरोनावर मात केली. रायगड जिल्ह्यात सध्या 6 हजार 373 रुग्णांवर उपचार सुरु आहे. रायगडमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रशासनाकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा : Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा, 14 जूनपासून काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर