Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा, 14 जूनपासून काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रामुख्याने अभ्यासिका, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहे.

Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा, 14 जूनपासून काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 7:00 PM

पुणे : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारीच याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रामुख्याने अभ्यासिका, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहे. (Relaxation from corona restrictions to several establishments in Pune)

सोमवारपासून पुण्यात काय सुरु?

>> पुणे मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालयांना परवानगी देण्यात आली असून उपस्थितीची मर्यादा क्षमतेच्या 50 टक्के असेल.

>> व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. मात्र, सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही.

>> मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.

>> कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

>> मॉल 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.

>> सोमवारपासून आस्थापनांना सायं. 7 पर्यंत सुरु ठेवता येणार.

>> अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

>> अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

>> सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.

>> पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.

>> ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

>> अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

>> विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.

>> रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील.

>> उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस स. 5 ते 9 व दु. 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

अजित पवार काय म्हणाले?

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले

Relaxation from corona restrictions to several establishments in Pune

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.