नवी मुंबई : माथाडी कामगारांसाठी काम करणारे नेते चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी कविता पाटील या दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपत माथाडी भवन येथे स्वखर्चातून सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उदघाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तुर्भे येथील प्रभाग क्रमांक 67 ते 72 मधील नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. (Patil couple working for Mathadi workers vaccinated at their own expense, inaugurated by Shashikant Shinde)
तुर्भे येथील प्रभाग क्रमांक 67 ते 72 या दोन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई एपीएमसी बाजाराचे घटक वास्तव्यास आहेत. गेली पाच दिवसांपासून शहरात लस उपलब्ध नसल्याने आजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली तसेच नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचे पालन केले होते. राज्यासह नवी मुंबई शहरात लसींच्या कुपींचा तुटवडा असताना या ठिकाणी खास आयोजन करून नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली. एकूण 600 लस उपल्बध असून १८ वर्षांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वाना पहिला डोस देण्यात येत आहेत. त्यामुळे तरुणाईसह वृद्धांपर्यंत सर्वांनी चांगलीच गर्दी केली होती.
राज्यात लसींना प्रचंड मागणी असून ठिकठिकाणी लसीकरणाला गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने धोरणात्मक कार्यक्रम राबवावेत असे केंद्र सरकार सांगत असले तरी लसींचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी राबवलेला मोफत कार्यक्रम कौतुकास्पद असून आपल्या नागरिकांना कोरोनाच्या लढाईत बळ मिळावे यादृष्टीने पाटील दाम्पत्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होतात मग महापालिकेला का नाही?, असा सवाल देखील शशिकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्याने पुढाकार घ्यावा असे केंद्र जरी सांगत असले तरी केंद्राने नियमित लस पुरवठा करावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
(Patil couple working for Mathadi workers vaccinated at their own expense, inaugurated by Shashikant Shinde)
हे ही वाचा :
“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती, सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात