सिंधुदुर्ग: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि माजी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. पण केवळ आरोपावरून कुणावरही कारवाई करणं चुकीचं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. (Pooja Chavan suicide case: cm uddhav thackeray will take proper action says dipak kesarkar)
दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोजकीच पण सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. पूजा चव्हाण प्रकरणात विरोधी पक्षाने राजकारण करू नये. हा प्रश्न राजकीय नाही. एका महिलेच्या न्यायाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: याप्रकरणी संवेदनशील आहेत. त्यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असं केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्री स्वत: निर्णय घेतील
केवळ आरोपावरून एखाद्यावर कारवाई करणं चुकीचं आहे. अशी कारवाई करणं घाईचंही ठरेल. या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास स्वत: मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेची तंबी
दरम्यान, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?
पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. मात्र 7 फेब्रुवारीला तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. (Pooja Chavan suicide case: cm uddhav thackeray will take proper action says dipak kesarkar)
आत्महत्या कधी झाली?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. (Pooja Chavan suicide case: cm uddhav thackeray will take proper action says dipak kesarkar)
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?
(Pooja Chavan suicide case: cm uddhav thackeray will take proper action says dipak kesarkar)