खेळण्यातील कारसाठी दहा वर्षाच्या तिघा पोरांनी घर फोडले; बाथरुमच्या खिडकीतून घरात प्रवेश; रक्कम बघून धक्का बसेल

| Updated on: Mar 24, 2022 | 11:35 PM

लहान मुलांनी म्हणजेच अवघ्या दहा वर्षाच्या असणाऱ्या शाळकरी मुलांनी खेळण्यातील इलेक्ट्रीक कार घेण्यासाठी चक्क अव्वल चोरट्यांनी चोरी करावी तशी चोरी केली आहे. तेही घरातील बाथरुमच्या खिडकीतील काचा तोडून घरात प्रवेश करुन रोख रक्कम लंपास केली आहे.

खेळण्यातील कारसाठी दहा वर्षाच्या तिघा पोरांनी घर फोडले; बाथरुमच्या खिडकीतून घरात प्रवेश; रक्कम बघून धक्का बसेल
wasai crime
Follow us on

वसईः सध्याच्या जगात प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत, आणि त्या पूर्ण त्या करण्यासाठी माणसं पाहिजे ते करायला तयार होत असतात. मग लहान मुलं असोत की मोठी माणसं असोत, आपल्या गरजा भागवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी काहीजण करत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार वसईतील नवयुगनगरमध्ये (Vasai Navayuganagar) घडला आहे. लहान मुलांनी म्हणजेच अवघ्या दहा वर्षाच्या असणाऱ्या शाळकरी मुलांनी खेळण्यातील इलेक्ट्रीक कार घेण्यासाठी चक्क अव्वल चोरट्यांनी चोरी करावी तशी चोरी (Theft) केली आहे. तेही घरातील बाथरुमच्या खिडकीतील काचा तोडून घरात प्रवेश करुन रोख रक्कम (Cash) लंपास केली आहे. त्यातील दोघांना पकडण्यात आले आहे.

वसईमधील नवयुगनगर येथे दहा वर्षाच्या तीन शाळकरी मुलांनी आपली हौसमौज भागवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबविला. या तिघा मुलांना खेळण्यातीर इलेक्ट्रीक कार पाहिजे होती. ती कार घेण्यासाठी त्यांनी पालकांकडे कारची मागणी न करता त्यासाठी चोरीचा मार्ग अवलंब केला.

खिडकी तोडून घरात प्रवेश

कारसाठी लागणारे पैसे चोरण्यासाठी म्हणून त्यांनी वसईतील नवयुगनगरमधील एका घरातील बाथरुमच्या खिडक्याच्या काचा फोडून त्यांनी घरातील 18  हजार रुपये लंपास केले. यासाठी त्यांनी घरामध्ये असणाऱ्या बाथरुमच्या खिडकीचा वापर केला. त्यांनी बाथरुमच्या खिडकीच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्या घरातील त्यांनी 18 रुपये घेऊन फरार झाले.

समज देऊन पालकांच्या ताब्यात

नवयुगनगरमधील हा प्रकार पोलिसांना समजताच चोरी करणाऱ्या तिघांपैकी दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आली. शाळकरी मुलांनी घराच्या खिडकीच्या काचा फोडून चोरी केल्याने पोलिसांनाही या मुलांचे आश्चर्य वाटले.

मुलांकडे लक्ष द्या

त्यामुळे माणिकपूर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी सांगितले की, खेळण्या बागडण्याच्या या वयात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर मुलं चोरीच्या घटनांकडे वळत असतील तर पालकांनी सावध होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मुंलांबाबत पालकांनी जागरुक राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

‘पैसे देतो, पोलिसांनी संरक्षण द्यावं’ फडणवीसांचे आभार मानताना बार्शीच्या आमदार पुत्रानं नेमकं असं का म्हटलं?

अंबरनाथमध्ये पालिकेचे गाळे व्यावसायिकांनी बळकावले, काही गाळ्यांमध्ये भरतोय चक्क जुगाराचा अड्डा

Breaking : राजू शेट्टींचे डोळे पाणावले! आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्लाबोल, स्वाभिमानीतून हकालपट्टी