नवी मुंबई : बेलापूर जेट्टी जवळ दोन बोटींना भीषण आग (boat fire) लागल्याची घटना समोर आली आहे. बेलापूर (belapur) जेट्टी शेजारी दोन बोटी उभ्या होत्या. या बोटींना भीषण आग लागली आहे. या आगीत बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. या बोटी डिझेल (Diesel) चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या, ताब्यात घेतल्यानंतर या बोटींना बेलापूर जेट्टी जवळ लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलापूर आणि वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागताच अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्र रुप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवांनकडून आग नियंत्रिण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील बेलापूर जेट्टी जवळ असलेल्या दोन बोटींना अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या आगीत दोनही बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिझेल चोरी प्रकरणात या बोटी पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक जास्त उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी खारमध्ये देखील बँकेच्या जळमजल्याला आग लागली होती. या आगीत बँकेचे नुकसान झाले होते. उन्हाळ्यात आगीच्या घटना टळाव्यात यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मनसेचा दोन वर्षानंतर मुंबईत पाडवा मेळावा; Raj Thackeray पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?
नागपुरात Belt मध्ये अडकला कंत्राटी कामगार, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने मृत्यू