पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना

| Updated on: Jul 25, 2021 | 6:54 PM

वर्सोवा मनसेतर्फे कोकण, महाड, चिपळूण येथे रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री तसेच वैद्यकीय कीट पाठविण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना
MNS
Follow us on

नवी मुंबई : पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण पट्ट्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी नागरिक पाण्यात तसेच इतर ठिकाणी अडकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर वर्सोवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी पुढे आली आहे. मनसेतर्फे कोकण, महाड, चिपळूण येथे रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री तसेच वैद्यकीय कीट पाठविण्यात आल्या आहेत. (Versova MNS has sent clothes food items and medical kits from ambulances to Konkan Mahad and Chiplun)

पूरग्रस्तांसाठी मनसे सरसावली

सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. या ठिकाणी शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर, मुसळधार पाऊस तसेच दरडी कोसळल्यामुळे येथे मोठे नुकसान झाले आहे. घरच नष्ट झाल्यामुळे येथील नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मुलभूत गरजांसाठी भटकावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसेने या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे.

मनसेतर्फे वैद्यकीय कीटसुद्धा पाठवण्यात आल्या

वर्सोवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोकण, महाड, चिपळूण येथील लोकांना मदत पाठवण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री मनसेतर्फे देण्यात आली आहे. तसेच पुरात जखमी झालेल्या नागरिकांसाठी मनसेतर्फे वैद्यकीय कीटसुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.

गरजेनुसार आवश्यक वस्तू पाठवल्या जाणार

या मदतीविषयी बोलताना “साहित्य पाठविण्यासाठी पहिली रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तेथे गेल्यावर माझी टीम गरजेनुसार आवश्यक ती सामग्री पाठवेल,” अशी माहिती वर्सोवा येथील मनसेचे पदाधिकारी सचिन गाड़े यांनी दिली.

इतर बातम्या :

Video | सांगलीत पुरामुळे घरं नेस्तनाबूत, झाडं उन्मळून पडली, मगरही आली रस्त्यावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात, नवनीत राणांचं टीकास्त्र

VIDEO: राज्याला मुख्यमंत्रीही नाही, प्रशासनही नाही, राज्य आम्हाला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत: नारायण राणे

(Versova MNS has sent clothes food items and medical kits from ambulances to Konkan Mahad and Chiplun)